Signed in as:
filler@godaddy.com
Signed in as:
filler@godaddy.com
नको वाटतात आता अर्थपूर्ण अक्षर
की जिथे त्याला शोधावे लागेल
नको वाटतात अश्या वाटा जिथे स्वतःची
पाऊलखुन सिद्ध करावी लागेल
अस्तित्व असुनही पाण्यासारखे प्रतिबिंब
पाहायला मिळेल असं जग नको
जिथे उमलताना श्वासासाठी झगडत
बसावे लागेल असं झाड नको
चालत्या बोलत्या जगाच्या पलीकडे
जाऊन शोधावे अस अस्तित्व हव
नकोत कहाण्या अशा जिथे राजानेच
फक्त राणीच होउन जावं
आभाळही हवय चांदण्याने भरलेलं
पण तुटत्या ताऱ्यांची वेदना नको
गजबजलेल्या आकाशात सुर्य हवा
पण कडकडलेलं ऊन नको
श्वास पाहिजे शरीराला पण
अन्नाचा साठा पचन होत नाही
दगदगीच्या दशकात अंतर्मन हव आहे
पण त्याला ओळखणारा देह नको
जगणं ही हव आहे पण जगण्यात
कोणाचीही बेरीज नको
एकट्याची वाट हवी आहे पण चालतांना
सोबत कोणाची पाऊलखुण नको
-सानिका उद्धव खेडकर
Copyright © 2025 shub.live - All Rights Reserved.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.